Monday, December 23, 2024

/

बोमनहळळी यांनी व्यक्त केली दिलगिरी’

 belgaum

जेष्ठ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रत्नकुमार मठपती हे जिल्हा क्रीडांगणावर आखाड्यात कुस्ती समोचालन करत होते वेगवेगळ्या पद्धतीने कुस्तीचे वर्णन पैलवानांची माहिती उपस्थित कुस्ती शौकिन त्यांना दाद देखील देत होते तेवढ्यात कुस्ती बद्दल कमी माहिती असणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ बी एस बोमनहळळी यांनी व्यासपीठावरून मठपती यांना कमी बोला असा सल्ला दिला त्यामुळं सकाळ पासून उन्हात तान्हात कुस्तीच्या प्रेमा पोटी संचालन करणे बंद करून आखाडा सोडला व जाहीर रित्या नाराजी व्यक्त केली.

मठपती यांनी आखाडा सोडताच मैदानात प्रेक्षकांनी आरडाओरडा केली त्यावर बोमनहळळी यांनी दिलगिरी व्यक्त करत मठपती यांना आखाड्यात परत या अशी विनंती केली त्यावेळी कुस्ती शौकिनानी डी सीना आखाड्यात या मठपतींची माफी मागा अशी मागणी करताच डी सी सारख्या अधिकाऱ्याला मठपती यांच्या पर्यंत जाऊन माफी मागावी लागली मग पुन्हा कुस्त्यांना सुरुवात झाली.

dc appoplgy

मठपती हे गेली 25 वर्षे कुस्ती क्षेत्रात कार्यरत आहेत या भागातील युवकांना कुस्ती समजावी यासाठी धडपड करत असतात त्यामुळे डी सीनी त्यांना कमी बोला असं म्हटल्याने त्यांना जिव्हारी लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आखाडा सोडला होता.शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्वतः डी सी ना त्यांच्या कडे जाऊन विनवणी करावी लागली तेंव्हा कुठं त्यांनी पुन्हा हातात माईक घेत समचलोचन सुरू केलं.

गेली कित्येक वर्षे आपण कुस्ती साठी राबत असून महिन्याला सव्वा लाख दीड लाख पगाराची नोकरी सोडून आपण कुस्ती साठी झटत आहे हा कुस्ती महोत्सव बेळगावात आणण्यासाठी विधान सौधच्या पायऱ्या झिजवल्या आहेत माझं जीवन कुस्तीसाठीच आहे असे ते म्हणाले.खेळात योगदान देऊन कुस्तीसाठी झटणाऱ्या या माजी जेष्ठ आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू समोर कुस्ती बाबत कमी ज्ञान असलेल्याडी सी सारख्या अधिकाऱ्याला झुकावे लागले अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती.

1 COMMENT

  1. A meeting of all associations & eminent people is arranged today at 4.30 pm in foundry cluster to discuss bifurcation of VTU & protest the Govt decision. Pl inform to all your viewers. Thanks & regards. Bharat Deshpande,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.