बेळगावातील जागरूक वकिलांनी एका पेक्षा एक बनावट गोष्टींवर प्रकाश टाकून जनतेची फसवणूक टाळण्याची मोहीमच उघडली आहे की काय? अशी परिस्थिती गुरुवारी पाहायला मिळाली नगरसेवक आणि वकील रतन मासेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एका अस्तित्वात नसलेल्या योजनेचे फॉर्म वाटून कशी दिशाभूल केली जात आहे यावर प्रकाश टाकला आहे.
शहरातील काही स्टेशनरी व इतर दुकानदार बेटी बचाव बेटी पडाव योजनेच्या नावाखाली अर्ज विकत आहेत.
हे अर्ज भरून दिल्यास 8 ते 34 वर्षांच्या मुलींच्या खात्यावर केंद्र सरकार 2 लाख रुपये जमा करणार आहे, असे सांगून फसवणूक केली जात आहे. आपण शोध घेतला असता अशी एकसुद्धा योजना नसून या फॉर्म च्या मार्फत माहिती जमवून ती सुद्धा विकली जात असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर सदर प्रकार होत वोट बँकेवर डोळा ठेऊन हा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे याची चौकशी करून जनजागृती करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या फॉर्मची व ते विकणाऱ्यांची चौकशी करावी तसेच जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.