बेळगावात लोकप्रतिनिधी म्हटलं की अतिक्रमणे हटवतेवेळी त्या स्थळी जाऊन टेम्बा मिरवणे आणि विकासाच्या नावाखाली अनेक गोर गरिबांची संपत्ती उध्वस्त करणे अशी इमेज बनली आहे मात्र या सगळ्याला फाटा देत आपल्या वार्डातील गोर गरीब जनतेची जागा विकास कामात कमीत कमी कशी जाईल याचा विचार करून अनेक गरिबांची घरे रस्त्यात अतिक्रमण होण्यास वाचवण्याचे काम या मराठी नगरसेवकाने केलेलं आहे.
शासकीय दरबारी फालो अप करून त्यांनी अनेक घरे विस्थापित होण्यपडून वाचवून जनतेच दुःख हे आता
आपलच दुःख आहे असे मानणाऱ्या या नगरसेवकांचे नाव अनंत देशपांडे आहे. विकास करा पण रयतेच्या पिकाच्या देटाला धक्का लागता कामा नये ही शिवरायांची भूमिका घेऊन सामान्य गोर गरिबांना त्रास न करता विकास साधणारे कमीच आहेत मात्र असे असताना देशपांडे यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून दिलाय.
अयोध्या नगर मधील मुख्य रस्त्यावरील जवळपास 11 मिळकती(घरे) स्मार्ट रोड मध्ये जाणार होत्या. त्या मिळकती भुईसपाट करण्याची वेळ आली होती, पण याभागाचे नगरसेवक अनंत देशपांडे आणि रस्ता कंत्राटदारांनी समन्वयातून तोडगा काढून हा रस्ता कमीत कमी नागरी नुकसान करून कसा साध्य करता येईल याची काळजी घेतली आहे.
स्मार्ट सिटी योजनेत मंडोळी रोड आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवण्यात येत आहे साधारणपणे 11 कोटी खर्च करून लायन्स भवन ते एअर फोर्स गेट पर्यंत पहिल्या टप्प्यात मंडोळी रोड स्मार्ट रोड होणार असून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता होत आहे.सर्व प्रकारच्या केबल, हायटेक टॉयलेट, सायकल ट्रॅक आणि इतर अनेक सुविधा या रस्त्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
देशपांडे बेळगाव live शी बोलताना म्हणाले की ‘लोकांची परिस्थिती गरीब आहे. एक घर तर पूर्णपणे ऊध्वस्त होणार होतं, यामुळे त्या सर्वांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक लढाईत मी स्वतः असल्याने नागरिकांनी साथ दिली. पुन्हा पुन्हा चर्चा करून आणि कंत्राटदार व माजी मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांच्याशी चर्चा करून घरे पडली जाणार नाहीत याची काळजी घेऊन सुधारित प्लॅन तयार केला आणि स्मार्ट सिटी इंजिनिअर यांच्याशी सल्लामसलत करून स्वखुशीने अनधिकृत बांधकामे काढून घेऊन सुधारित आराखड्यानुसार काम सुरू करण्यात आले. याकामी रस्त्याचे कंत्राटदार प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई चे संचालक अमोल हळूरकर, सुभाष कोतेकर यांचेही योगदान लाभले आहे.
स्मार्ट सिटीचा स्मार्ट रस्ता करताना नागरिकांना विश्वासात घेऊन काम सुरू आहे. बेळगाव live ने या कामाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता नगरसेवक अनंत देशपांडे यांनी कंत्राटदार, नागरिक आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यांच्यात समन्वय साधून जे काही काम करून दाखवले आहे त्याचा आदर्श प्रत्येकाने घेण्यासारखा आहे.