बेळगाव येथील सांबरा विमानतळावर आज एक चमत्कारिक घटना घडली आहे. एक काँग्रेस खासदाराने भाजप च्या आमदाराची पुंगी वाजवली आणि त्या आमदाराला पळता भुई थोडी झाली. सर्व पत्रकारांच्या समक्ष झालेली ही घटना विनोदाने भरलेली होती पण या घटनेने करमणुकी बरोबरच बेळगावच्या त्या आमदाराची फजिती सुद्धा केली आहे.
मिश्यावर ताव मारणारे एक काँग्रेसचे खासदार विमानतळावर आले. त्यांना स्टार एअर च्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. कार्यक्रमाला उशीर असल्याने त्यांनी पत्रकारांसोबत चर्चा करत बसण्यात वेळ घालवला. यावेळी आपल्याला बेळगाव मधून खासदारकीचे तिकीट मिळवले तर काय होईल? यावर चर्चा रंगत होती.
इतक्यात पहिल्यांदा आमदार झालेली भाजपची व्यक्ती दाखल झाली. काँग्रेस खासदाराने त्यांना जवळ बसवून घेतले व म्हणाले की याला सुद्धा मी फोन केला होता, यालाही मी बेळगाव मधून खासदारकीस उभे राहिलो तर नक्की निवडून येईन असे वाटते.
असे म्हटल्यावर सर्व पत्रकार हसू लागले आणि त्या आमदाराला काय बोलायचे हेच कळले नाही. मी कधी म्हटले, मी कधी म्हटले एवढेच म्हणून त्या आमदाराने त्या बैठकीतून जाणे निवडले आणि माझा काय संबंध नाही असे तो सांगत होता.
खासदारांनी त्याची पुंगी वाजवल्याने पत्रकार हसून हसून लोटपेट झाले.