भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवाद्यांचा केलेला खात्मा हा हा विषय संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा ठरला आहे.
बेळगाव येथेही याचा जल्लोष सकाळपासून सुरू झाला असून रात्री उशिरापर्यंत जल्लोष कायम आहे.
प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर फटाके उडवून भारताच्या या विजयाचा जल्लोष सुरू आहे. रात्र झाली तरी अजून वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषी मालिका सुरूच असून गल्ली गल्लीतील युवक एकत्र जमून फटाके उडवू लागले आहेत.
या युवकांमध्ये देशभक्तीचा हुंकार दिसू लागलाय. भारतीय हवाई दलाने काल रात्रीच्या वेळी केलेले सर्वात मोठे काम हे दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणारे ठरले आहे. यामुळे हा जल्लोष कायम आहे.