बेळगाव तालुक्यातील चारी बाजूनी होणाऱ्या प्रास्तावित रिंग रोडला आणि हलगा मच्छे बाय पास रोडसाठी सुपीक जमिनी संपादित करण्या विरोधात गुरुवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महा मोर्चाचे आयोजन केले आहे.या महा मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत.
दरम्यान पोलीस खात्याने काही अटीवर मोर्चाला परवानगी दिली आहे वेळेत मोर्चा काढावा,कोणत्याही समाज किंवा धार्मिक भावना दुखावतील अश्या घोषणा देऊ नये,मोर्चा दरम्यान सार्वजनिक सरकारी मालमत्तेचा नुकसान करू नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत.
बुधवारी समितीच्या कार्यालयात आज रिंगरोड विरोधी महामोर्चा पुर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.उद्या होणाऱ्या महामोर्चात सीमाभागातील तमाम शेतकरी बांधवानी,युवकांनी तसेच शहरवासियांनी मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन सरकारचे शेतकरी विरोधी धोरण,षडयंत्र हाणून पाडा असे आवाहन करण्यात आले.
मोर्चासाठी २५ जणांच्या नियंत्रण कमिटीची स्थापना करून, मोर्चात कोणत्या घोषणा असाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावातील बांधवानी आपापल्या गावच्या बॅनरसह बैलगाडी, ट्रॅक्टर, जनावरांसकट सकाळी १०:०० वा. सरदार मैदान येथून मोर्चात सामील होऊन मोर्चा यशस्वी करावा असे देखील आवाहन करण्यात आले.
महा मोर्चात अश्या असाव्यात घोषणा
* नाही नाही कधीच नाही रिंगरोडसाठी पिकावू जमीन देणार नाही.
* रद्द करा, रद्द करा, रिंगरोड प्रस्ताव रद्द करा.
* रद्द करा , रद्द करा, हलगा मच्छे बायपास रद्द करा.
*शेतकरी विरोधी धोरणांचा धिक्कार असो.
* जय जवान जय किसान.
*रिंगरोड हटाव , शेतकरी बचाव.
* शेतकरी टिकेल तर देश टिकेल.
* शेतकऱ्यांचा पिकावू जमिनीला हात लावाल तर खरदार!