काकतीवेस नजीक झालेला स्फोट कशाचा याबद्दल शोध घेण्याचा प्रयत्न अग्निशामक दल व पोलीस दल घेत असताना प्राथमिक तपासात हा सिलिंडर चा स्फोट असल्याचे उघड झाले असून स्फोटाचे दुसरे कोणतेही घातपाती कारण नसून हा निव्वळ अपघात आहे याची माहिती मिळाली आहे पण या कॉम्प्लेक्स मधील कुणाला काही इजा झाली का याबद्दल स्पष्ट काही कळू शकलेले नाही.
एसी म्हणजेच वातानुकूलन यंत्रणेसाठी एक विशिष्ट प्रकारचे गॅस सिलेंडर वापरले जाते. या सिलिंडर चा हा स्फोट असल्याची प्राथमिक माहिती आहे. एसी ला जोडण्यासाठी हे सिलिंडर आणून ठेवण्यात आले होते त्यामध्ये हा स्फोट होऊन खळबळ माजली आहे.
जम्मू काश्मीर येथील आतंकवादी हल्याने सर्वत्र वातावरण संवेदनशील असताना या स्फोटांनी अनेक अफवा पसरू लागल्या असून त्यावर विश्वास न ठेवता आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या यंत्रणा व पोलिसांकडून योग्य माहिती लवकरच मिळू शकणार आहे. ती माहिती मिळेपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे हे बेळगावकरांनी लक्षात ठेवून राहण्याची गरज जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.