भारत स्वातंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारी यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. मात्र भारत स्वातंत्र झाल्यावरही येथील शेतकऱ्यांना मात्र काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत असल्याचा अनुभव सध्या तरी येत आहे. मार्कंडेय नदीचे पाणी ड्रेनेज मिश्रीत झाल्याने या काळ्या पाण्याची शिक्षा कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेळगाव दक्षिणकडून अनेक शेतकऱ्याना जीवन दाईनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीत ड्रेनेज पाणी मिश्रीत होऊन शेतीचा पोत कमि होत चालला आहे. या पाण्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. वारंवार तक्रारी आणि निवेदने देऊन देखील प्रशासने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतीबरोबरच शेतकरी कुटुंबातील सदस्याचाही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
42 की मी वाहत जाऊन ही नदी घटप्रभेला मिळते. या नदीचा पुनरुज्जीवनासाठी सुमारे 5 कोटी रुपये उद्योग खात्रीतून खर्च करण्यात आले आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या नदिकाठी अनेक पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आहेत. मात्र नदीतील पाणी विहिरीत मिश्रीत होत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या काळ्या पाण्याची शिक्षा साऱ्यांनाच झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी ही नदी स्वच्छ ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. मात्र प्रशासनांने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षाच मिळाल्याचे दिसून येत आहे.
स्वतंत्र भारतात नागरिकांच्या हक्कावर यामुळे बाधा आली आहे.