शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर म्हणजे नवीन नाही, त्यांच्या शाळेत लहानपणापासूनच कॉम्प्युटर लॅब ची आणि कॉम्प्युटर ची व्यवस्था असते. घरोघरी कॉम्प्युटर असतात त्यामुळे लहानपणापासूनच संगणक फ्रेंडली होऊन पुढे जाण्याची किमया विद्यार्थी साध्य करत असतात. ग्रामीण भागात मात्र ही सोय उपलब्ध होत नाही.
ही गरज ओळखून सुळगे येळ्ळूर येथील रहिवासी आणि सध्या बेळगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोपाळराव कुकडोळकर यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे.
शाळेचे माजी विद्यार्थी असलेले कुकडोळकर यांनी अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त अशी संगणक खोली सरकारी मराठी मुलांची शाळा सुळगे येळ्ळूर येथे बनवली आहे. ग्रामीण भागातील मुलांना ही संगणक हाताळता यावेत प्रोजेक्टर व इतर गोष्टींच्या माध्यमातून नवनवीन शिक्षण घेता यावे या उद्देशातून गोपाळराव कुकडोळकर यांनी ही व्यवस्था केलेली आहे. अतिशय जुनाट अशा एका शाळेच्या खोलीला नवीन रूप देऊन त्यामध्ये ग्रीन बोर्ड तसेच संगणक ची व्यवस्था त्यांनी केली असून हा उपक्रम आदर्श ठरला आहे.
सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत उद्या प्रगती परिवर्तन दिन साजरा केला जाणार आहे यावेळी या संगणक लॅब चे उद्घाटन करून शाळेच्या मुलांसाठी खुली करण्यात येणार आहे. कुकडोळकर हे यशस्वी उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती बेळगावकरांना असून ते प्रसिद्ध आहेत.
आपल्या शाळेतील मुलांना संगणक हाताळता यावेत या दृष्टीने विचार करून गोपाळराव कुकडोळकर यांनी केलेली वाटचाल अनेकांसाठी आदर्श अशीच आहे.
Nice news….. please go through here