Tuesday, December 24, 2024

/

बेळगाव live तर्फे झाले बक्षीस वितरण. कोण ठरले विजेते?

 belgaum

सेल्फी किंव्हा ग्रुप फोटो विथ किल्ला या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी बेळगाव live ने केला आहे. मान्यवर उपस्थितांच्या हस्ते झाला आहे बक्षीस वितरण कोण ठरलेत विजेते याची माहिती बेळगावकरांसाठी देत आहोत.

या स्पर्धेला बेळगाव उत्तर, ग्रामीण, आणि दक्षिण या भागातून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहिला आणि प्रत्येक विभागासाठी भरगोस बक्षिसे देण्याचा निर्णय बेळगाव live ने घेतला. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी प्रायोजकत्व देऊन साथ दिली आणि आज बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे.
या संपूर्ण स्पर्धेतील महाविजेता म्हणजेच गडांचा राजा हा पुरस्कार तुरमुरी येथील शिवतेज ग्रुपच्या किल्ले रत्नदुर्ग ला देण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण भागात तरुण आणि बालके तन मन धन अर्पण करून शिवरायांचा इतिहास जपण्यास प्रयत्न करत असतात. रत्नदुर्ग हा किल्ला अतिशय हुबेहूब बनवून आपले शिवप्रेम तुरमुरीच्या समूहाने दाखवून दिले होते याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे.

Killa

याच बेळगाव ग्रामीण विभागात आणखी तीन समूह उपविजेते ठरले आहेत. यामध्ये जंजिरा किल्ला बनवणारे कल्लेहोळ येथील स्वराज्य युवक मंडळ, किल्ले गोपाळगड बनवणारे उचगाव येथील श्रीराम चौक
नागेश नगर चे समूह आणि कंग्राळी बुद्रुक येथील रौद्र शंभू ग्रुप मराठा गल्ली येथील समूह यांचा समावेश आहे.

बेळगाव दक्षिण भागात रयत गल्ली वडगाव येथील विजय दुर्ग, रामलिंग सामाजिक युवक मंडळ जुने बेळगाव आणि सोनार गल्ली वडगाव येथील समूहाचा समावेश आहे.

बेळगाव उत्तर विभागात समर्थ नगर पाचवा क्रॉस एथिक विराट गड, महाद्वार रोड क्रॉस क्र 3 मधील नळदुर्ग आणि समर्थ नगर येथील समूहाने बनवलेल्या मल्हार गडाची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील सहभाग मोठा होताच पण थेट ऑस्ट्रेलिया येथून सुद्धा किल्ला बनवून पाठवण्यात आला होता, याची दखल घेऊन उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया येथे किल्ला बनवलेले मूळचे शाहू नगर येथील रोहित अंची, पटवर्धन ले आऊट येथे सुहासिनी महिला मंडळच्या माध्यमातून मुली आणि महिलांनी बनवलेला किल्ला व जेड गल्ली, शहापूर येथील किल्ल्याला आणि पिरनवाडी येथील किल्ल्याला देखील उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.