जिल्ह्यातील सर्व पीडिओ अधिकाऱ्यांची झाडाझडती
नुकतेच रुजू झालेले आणि आपला वचक कायम ठेवण्यासाठी पीडिओ आणि तालुक्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरणाऱ्या नूतन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यातील पीडिओ आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत होऊन बसली आहे. काम करा नाहीतर घरी बसा असा इशाराच देण्यात आला आहे.
आजच जिल्हा पंचायत येथे घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक अधिकाऱ्यांना काम करण्याचा कानमंत्र दिला आहे. यापुढे कोणाच्या ही तक्रारी ऐकावयास किंवा निदर्शनास आल्या तर गय केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक अधिकारी वर्गाची चांगलीच दमछाक उडणार आहे. त्यामुळे यापुढे नखरे करणाऱ्या अधिकाऱ्यांना पंचायत होऊन बसणार आहे.
सोमवरी व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी आपल्या सूचना सांगताना अनेक कामचुकार अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. यापुढे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सांगण्यात आले.
प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी ऐकावयास येत आहेत. काही पीडिओ तर आपल्या मनमानी कारभाराने प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यापुढे जपुन राहण्याचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. कुणाला काम होत नसेल तर त्यांनी घरी बसावे. कामात कसूर केलेल्याना कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगण्यात आले. या त्यांच्या इशाऱ्यामुळे अनेकांची भंबेरी उडाली होती