मागील काही दिवसापासून कडाक्याच्या थंडीने हुडुहुडणाऱ्या नागरिकांना आता उष्म्याचा सामना करावा लागतो आहे. गुरुवारी बेळगावचे कमाल तापमान 33 तर किमान तापमान 20 पर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे आता गारव्यासाठी नागरिकांची कसरत लागण्याची शक्यता आहे. आत्ता खरा उन्हाळा सुरू झाला आहे.
मागील काही दिवसापासून पडलेल्या थंडीने अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. तर महाराष्ट्र मध्ये नाशिकमध्येही अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही थंडी अनेकांना त्रासदायक ठरल्याचे दिसून येत आहे. याचा विचार करून अनेकांनी थंडी नकोरे बाबा अशीच इछा व्यक्त केली होती.
मागील दोन दिवसापासून उष्म्यात वाढ झाली असून केवळ दोन दिवसांत बेळगाव येथील पारा 33 अंशावर जाऊन पोहचला आहे. यापुढे यात मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पहिला थंडीने आणि आता गर्मीने नागरिक हैराण होणार आहेत.
महिन्याभरापूर्वी उबदार कपडे खरेदीकडे नागरिक वळले होते आता सुती आणि गर्मीत उपयोगी ठरणारे कपडे घेण्याकडे वळणार आहेत. त्यामुळे उन्हाची तीव्रता अजून वाढणार असून याची धास्ती मात्र नागरिकांनी आतापासून घेतल्याचे दिसून येत आहे.