नीम का पत्ता कडवा है…पाकिस्तान भडवा है।

0
1085
Muslim rally
 belgaum

हातात मेणबत्ती आणि पाकिस्तान मुरदाबाद चे फलक घेत, सियासत को रोख दो…पाकिस्तान को तोड दो….पाकिस्तान मुरदाबाद अश्या घोषणा देत बेळगावातील मुस्लिम बांधवांनी मेणबत्ती मोर्चा काढत पुलवामा येथील शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

शनिवारी सायंकाळी शहरातील कित्तूर चन्नम्मा चौका तुन सम्राट अशोक चौका पर्यंत मेणबत्ती मोर्चा काढत जवानांना आदरांजली अर्पण केली.बेळगाव शहर मुस्लिम जमाती च्या वतीने या श्रद्धांजली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आठशेहून अधिक युवकांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.अशोक चौकात मौन पाळून जवानांना श्रद्धांजली वाहिली.

Muslim rally
यावेळी नगरसेवक मुझममिल डोनी,मतीन शेख अली,बाबूलाल मुजावर माजी नगरसेवक अजीम पटवेगार, लतीफ पठाण,मोहंमद पिरजादे,फिरदोस दरगाह आदी उपस्थित होते.

 belgaum

वकिलांनी काम बंद आंदोलन

बेळगाव बार असोसिएशनच्या च्या वतीनं पुलवामा हल्ल्याचा निषेध करत शहरात रॅली काढण्यात आली. शेकडो वकिलांनी या रॅलीत सहभागी होऊन पाकिस्तान मुरदाबाद च्या घोषणा दिल्या.काश्मीर वर झालेला हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे त्याच भाषेत पाकला प्रत्युत्तर द्या अशी मागणी वकिलांनी केली यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दशहत वाद्यांचा बंदोबस्त करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.