बेळगाव live आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा समारंभ शुक्रवार दि 8 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आजरा येथील शिवसेना नेते प्रा सुनील शिंत्रे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल,हॅथवे केबल नेटवर्कचे सीईओ संजय कडोलकर, ज्येष्ठ फोजदारी वकील मारुती कामान्नाचे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक अनंत लाड,सिटिझन कौन्सिल बेळगाव चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त प्रणव विलास अध्यापक आणि राष्ट्रीय शोर्य ‘किताब प्राप्त निखिल जितुरी यांचा सत्कार केला जाणार आहे.
बेळगाव शहर आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि अपडेट्स देण्याकरिता बेळगाव live मागील दोन वर्षापासून काम करीत आहे. सर्वांचे लाडके मराठी न्यूज पोर्टल ही बेळगाव live ची अल्पावधीत ओळख बनली आहे.
यावर्षी नवीन तरुण आणि बालकांमध्ये शिवरायांबद्दल जागृती निर्माण करण्याचा उद्देश ठेऊन आणि त्यांनी निर्माण केलेल्या गड किल्ल्यांची माहिती व्हावी या उद्देशाने किल्ला निर्मिती या प्रथेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
“सेल्फी किंव्हा ग्रुप फोटो विथ किल्ला” ही स्पर्धा आयोजित केली होती. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी स्वतःहून या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले व सहकार्य दिले.
या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्याचा कार्यक्रम बेळगाव live ने ठेवला आहे. आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करीत आहोत.
स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांनी या समारंभाला उपस्थित राहावे असे प्रकाश बेळगोजी, संपादक
बेळगाव live यांनी आवाहन केले आहे.