बेळगाव येथील के एल ई एस, इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी अवघ्या 52 सेकंदात गीटारच्या स्वरात राष्ट्र गीत गाऊन विश्वविक्रम नोंदविला आहे.
गीटार वादन विश्व विक्रम मध्ये सातवी ते नववीच्या 100 विद्यार्थ्यांचा समावेश होता. एक सुरात गीटार वाजवून राष्ट्रगीत सादर केले,आणि बेळगाव येथील के एल ई इंटरनॅशनल स्कूल ने विश्वविक्रम बुक मध्ये आपले नाव नोंदविले.
यावेळी वर्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे डायरेक्टर पवन सोळंकी यांनी स्कूलच्या मुख्याध्यापिका ,डॉ प्रीती दोडवाड व मुझिक शिक्षक विशाल सिंग सह विद्यार्थ्यांना विश्वविक्रमचे पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
यावेळी विद्यार्थी आरुष दोडवाड व सानवी कित्तुर तसेच म्युझिक टीचर विशाल सिंग यांनी मनोगत व्यक्त केले.