महाराष्ट्र शासनाच्या कोंकण कृषी विभागाच्या स्पर्धा परीक्षेत धामणे(येळ्ळूर) येथील कन्येने यश मिळवत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. श्वेता बेळगुंदकर असे तिचे नाव असून तिची कृषी सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे.
कोकण कृषी विभागामार्फत दि. 13/04/2018 रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तिने हे यश मिळवले आहे.
जवळ पास एक वर्षानंतर परिक्षेचा निकाल लागला आहे. मूळची बेळगाव तालुक्यातील धामणे गावची श्वेता शिनोळी(ता.चंदगड)येथे वास्तव्यास होती.आई महाराष्ट्र शासनाच्या शिक्षिका पेशात असल्याने तिचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे प्राथमिक शिक्षण शिनोळी तर माध्यमिक शिक्षण देवरवाडी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण हलकर्णी येथे झालेले आहे.
शिनोळी खुर्द ता चंदगड येथील असलेल्या श्वेताचे शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झालेले आहे.लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव येथून कृषी पदवी मिळवल्या नंतर कोल्हापूर येथे ती स्पर्धा परीक्षांचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होती.
कठोर मेहनत आणि सततचा अभ्यास, जिद्द यातून तिने हे यश मिळवले आहे. आणि विशेष म्हणजे तिने हे यश कोणताही क्लास न लावता मिळवलेले आहे.श्वेताची आई निवृत्त प्राथमिक शिक्षिका आहे तिचे मार्गदर्शन तिला लाभले .त्याच बरोबर वडिलांचे पाठबळ सुद्धा तिच्या यशात तितकेच महत्त्वाचे होते. गावकरी, तिचे शिक्षक, कुटुंबीय, यांची मदत तिला वेळोवेळी झाली आहे.