Monday, December 23, 2024

/

‘भाजप युवा मोर्चा पदाधिकारी अटकेत’

 belgaum

वाढदिवसाच्या निमित्त तलवारीने केक कापल्याने दहशत निर्माण केल्याचा आरोप ठेऊन बेळगाव भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
निखिल मुरकुटे रा.गांधी नगर बेळगाव असे त्याचे नाव आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर तलवारीने केक कापण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर काही टीव्ही चॅनेलवर ही बातमी पसरली.

Bjp arrest

केक कापताना तलवार वापरून दहशत निर्माण केली असा ठपका ठेऊन त्याला ही अटक झाली आहे. एक मित्राने तलवार भेट दिली व त्याच तलवारीने केक कापण्याचा हट्ट धरला होता पण हा प्रकार त्यास महागात पडला आहे.
कलम 110 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.