नाट्यकला संस्कृतीची चळवळ सीमा भागातूनच उगम पावली आहे मराठी नाट्य कला जिवंत ठेवण्याची सीमाभागात गरज होती ती गरज या आंतरराज्य नाट्य स्पर्धा आयोजना द्वारे पूर्ण झाली आहे असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
रविवारी सायंकाळी लोकमान्य रंग मंदिरात आंतरराज्य नाट्य एकांकिका स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण केल्यावर ते बोलत होते.यावेळी परीक्षक संभाजी सावंत ज्ञानेश मुळे चंद्रकांत अत्रे,कॅपिटल वनचे शिवाजी हंडे प्रा.संध्या देशपांडे आदी उपस्थित होते. येळ्ळूर साहित्य संमेलनात सहभागी झालेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी बक्षिसे वितरित करून एकांकिका स्पर्धकांना प्रोत्साहन दिले
अश्या नाट्य स्पर्धा भरवत कॅपिटल वन ही संस्था बेळगावात जोमाने कार्य करत आहे अश्या शुभेच्छा देत एकांकिकेत बक्षीस मिळालं म्हणजे सर्वस्व नव्हे यापुढेही जिंकलेल्यानी आणि स्पर्धकांनी जोमानी काम करावं असे देखील आवाहन त्यांनी कलावंतांना केलं.झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा असे आवाहन देखील त्यांनी केलं.
खालील प्रमाणे आहेत विजेते
…(2019 खुला गट सांघिक)
प्रथम -राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निलॉजी (कस्तुरा)
द्वितीय- अभिनय कल्याण(युरेका युरेका)
तृतीयांश-रुद्रान्स अकादमी कोल्हापूर(इट हपन्स)
अभिनय (पुरुष)
प्रथम -अभिनय कल्याण(सुरेका सुरेका)- (तो राहुल शिरसाट)
द्वितीय- राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निलॉजी (कस्तुरा)-(भाऊराव,विजय महाडिक)
तृतीय-तथास्तु थिएटर (विलग)-(श्री- विजय कुलकर्णी)
अभिनय (स्त्री)
प्रथम -अभिनय कल्याण(सुरेका सुरेका)- (ती ,सोनाली मगर)
द्वितीय- राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निलॉजी (कस्तुरा)-(कस्तुरा ,श्रुतकीर्ती सावंत)
तृतीय-कॉमन टच प्रोडक्शन बेळगाव (लाली)-(आवली,अंकिता कदम)
दिग्दर्शन
प्रथम -राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निलॉजी (कस्तुरा, सुशांत घाडगे)
द्वितीय- अभिनय कल्याण(युरेका युरेका,अभिजीत झुंझारराव)
तृतीयांश-रुद्रान्स अकादमी कोल्हापूर(इट हपन्स, सुदर्शन खोत)
उत्कृष्ट नेपथ्य
बेळगाव एक्कावन्न पार्टी बेळगाव (द्रोण संकेत लोहार)
उत्कृष्ट वेशभूषा
टीम स्पॉट लाईट कोल्हापूर(नंगी आवाजे, देवयानी देसाई)
उत्कृष्ट प्रकाश योजना
राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निलॉजी (कस्तुरा,सौरभ येडगे)
उत्कृष्ट पाश्वसंगीत
अभिनय कल्याण(सुरेका सुरेका,राजस पंधे)