पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका वाहनाच्या धडकेत शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
कुबेब अनिस शेख (वय 13) असे आझाद नगर येथील त्या मुलाचे नाव आहे. महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
वाहतूक उत्तर विभागाचे निरीक्षक आर आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.