Tuesday, January 7, 2025

/

‘मराठी शाळा क्रमांक 5 शताब्दी महोत्सव रविवारी’

 belgaum

‘चव्हाट गल्ली येथील सरकारी आदर्श मराठी मुला मुलींची शाळा क्रमांक 5 या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून शाळेचा शताब्दी महोत्सव येत्या रविवारी 24 फेब्रुवारी रोजी भव्य प्रमाणात साजरा होत आहे’ अशी माहिती शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष किसन येळूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘मराठी माध्यमाच्या शाळांची विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या पाहता मराठी शाळाना भविष्यात चांगले दिवस नाहीत हे लक्षात घेऊन आम्ही माजी विद्यार्थ्यांनी आणि माजी शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक ही शाळा वाचविण्याचा प्रयत्न केला आहे, गेल्या दीड वर्षात शाळा बचाव समिती आणि माजी विद्यार्थी संघटना यांनी प्रयत्नपूर्वक आठ ते दहा लाख रुपये जमा केले आणि त्यातून शाळेमध्ये स्मार्ट क्लास, संगणक वर्ग ,शाळेची रंगरंगोटी आणि इमारतीची देखभाल अशी अनेक कामे केली आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी मराठी मातृभाषेत शिक्षण देण्याची गरज आहे हा मुद्दा या परिसरातील मराठी लोकांना आम्ही पटवून दिला .

त्यामुळे या शाळेला विद्यार्थ्यांचा प्रश्न पुढे येणार नाही ‘असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या शाळेसाठी आपण पाच लाख रुपयांची ठेव ठेवणार असून त्याच्या येणाऱ्या व्याजातून दरवर्षी शाळेला खर्च केला जाईल अशी घोषणाही एड. किसन येल्लुर कर यांनी यावेळी केली. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ग्रंथदिंडी निघणार असून दुपारी तीन वाजता ध्वजारोहण, सरस्वती प्रतिमा पूजन व स्मार्ट खोल्यांची उद्घाटन होईल. त्यानंतर चार वाजता शाळे समोर असलेल्या मराठा मंडळ हायस्कूलच्या खुल्या सभागृहात शताब्दी महोत्सव साजरा होईल .

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर जे एफ पाटील हे उपस्थित राहणार असून आहेत .तसेच बेळगावचे महापौर बी एस चिखलदिनी, उपमहापौर मंजुश्री पुजारी, खासदार सुरेश अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार अरुण शहापूर, मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शताब्दी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून एडवोकेट अनिल बेनके (उत्तर बेळगावचे आमदार) हेआहेत
पत्रकार परिषदेप्रसंगी शताब्दी महोत्सवाचे कार्यवाह विश्वजीत हसबे, खजिनदार प्रा एम एम जाधव ,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर, सहकार्यवाह रवी नाईक यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी गेल्या वर्षभरात शाळेसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.