सध्या बेळगाव शहराच्या सभोवताली रिंग रोड करण्याचा सरकारचा प्रस्ताव सुरू आहे त्यासाठी प्राथमिक परीक्षण सर्वेक्षण सुरू आहे. ज्या ज्या भागातून या रोडची आखणी सुरू आहे त्या भागातील सर्व शेतकरी बंधूनी संतप्त होऊन गेल्या महिन्याभरापासून निवेदनाच्या माध्यमातून लढा पुकारला आहे. या सर्व लढ्याला अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दिलेला आहे .एपीएमसी मार्केट यार्ड मर्चंट्स यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे ठरवले आहे .
आपला भारत देश शेतीप्रधान आहे. अनेक ठिकाणी निसर्गाने नटलेला आहे. आमच्या देशातील अन्नदाता शेतकरी या भारताचा कणा समजला जातो. या शेतकऱ्यावर वाईट वेळ आली आहे .
दुष्काळ अवेळी पाऊस अशा संकटात बरोबरच सरकारच्या नवनवीन धोरणांची आता शेतकऱ्याला भीती वाटत आहे. सरकारने देशातील नागरिकांचा विकास साधावा त्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र देशाच्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडील अल्पदरात जमीन खरेदी करून किंवा न झाल्यास ती जमीन हस्तांतरित करून त्यावरील रस्ते आणि इतर प्रकल्प केले जातात. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी किती जमिनीचा वापर केला जातो…? हजारो एकर जमिनी शेतकऱ्याकडे हस्तांतरित करून घेऊन पडून राहिले आहेत मात्र सरकारने घेतलेल्या जमिनीचा वापर केला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून रिंगरोड करू नये पडीक जमिनीचा वापर करावा असे म्हणून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.