प्राथमिक शाळाना पोषक आहार देण्यासाठी सरकारने विविध संस्थाना कंत्राट दिले आहे. मात्र दर्जाहीन आहार असल्याने अनेक मुलांनी याकडे पाठ फिरवली असून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
माध्यान्ह आहार हा प्रत्येक सरकारी शाळांना पुरविण्यासाठी एनजीओना याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र एक कंत्राटी ठेकेदाराने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला धरत असल्याचे प्रकार सामोरे आले आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांना कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
काही ठिकाणी तर माध्यान्ह आहारात आळी, पाल आणि काही कीटक देखील आढळले आहेत. निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करून आपला खिसा गरम करण्यावर अनेक ठेकेदार आणि संबंधित अधिकारी धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. याचा विचार गांभीर्याने करावा अशी मागणी होत आहे.
माध्यान्ह आहार चा दर्जा वाढविण्याचे सोडून आपल्याला असा फायदा मिळेल यावरच अधिकतर भर देण्यात येत आहे. यामुळे हा प्रकार कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांचा मिलीभगत मुळे मुलांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जात असून यापुढे तरी याचा विचार करून दर्जेदार आहार देण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.