बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या हुबळी धारवाड चे पोलीस आयुक्त असलेल्या बी एस लोकेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांची बदली करण्यात आली आहे.
यापूर्वीही बदली आदेश काढून राजेंद्रप्रसाद यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती पण काही कारणांनी ही बदली रद्द करून हा नवीन आदेश काढण्यात आला आहे.
आता हे पद तात्काळ स्वीकारा असे आदेश लोकेशकुमार यांना देण्यात आले आहेत.