तालुक्यातील सर्व ग्राम विकास अधिकारी आणि तालुका पंचायत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नूतन जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चांगलीच झाडाझडती घेतली आहे. यापुढे कोणाच्याही तक्रारी आल्यास पहिला निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून त्यानंतर चौकशी केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. फैसला ऑन दी स्पॉट च्या या इशाऱ्याने खळबळ माजली आहे.
नुकत्याच जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर नागरिकांच्या कामासाठी पैशांची मागणी कोणीही करू नये. अशा घटना टाळून नागरिकांच्या मनात अधिकाऱ्यांबद्दल चांगली भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील अनेक पीडिओ आणि अधिकाऱ्यांच्या कारवाया कानावर आल्या असून त्यांनी अशा प्रकारातुन बाहेर पडावे. नागरिकांच्या कामासाठी अनेकांनी आपली झोळी भरून घेण्यात धन्यता मानली आहे . अशानी आता कामावर लक्ष देणे त्यांच्यासाठी बरे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
काही पीडिओ केवळ संगणक उतारा आणि जमिनी एनए करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यापुढे नागरिकांची कामे करून देण्यावर भर द्यावा असे सांगण्यात आले. यापुढे कोणाचाही विचार केला जाणार नाही. कारवाई करून विचार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.