येळ्ळूर विभाग जिल्हा पंचायत सदस्य व बेळगाव जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य विभागाचे स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यानी येळ्ळूर गावामध्ये आता पर्यंत ८० ते ९० लाख रुपयांची कामे मंजुर करून त्या कामाना सुरुवात केली आहे.
येळ्ळूर गावातील सर्व ग्राम पंचायत सदस्य व जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना घेऊन सुरवात केली असून त्यांच्या ह्या कार्यांचं सर्व गावभर कौतुक होत आहे.
नुकतेच रमेश गोरल यांनी मंजूर केलेल्या निधीतून येळळूरवाडी शाळेच्या कंपाऊंडचे भूमिपूजन करण्यात आले. येळ्ळूर – जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल ( शिक्षण व आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष )यांच्या हस्ते प्राथमिक मराठी शाळा येळळूरवाडी शाळेच्या कंपाऊडचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच रमेश गोरल यानी शाळेतील समस्याबाबत माहिती घेतली. शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, मध्यान्ह आहार या बाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया परीट, सर्व सदस्य, सदस्या ,शाळा सुधारणा समिती अध्यक्ष परशराम कणबरकर सर्व सदस्य सदस्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील वसर्व शिक्षक उपस्थित होते.