यावर्षी जोंधळा पिकाचे जोरदार उत्पादन येऊ लागले आहे. बेळगाव शहर आणि परिसरात आणि तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी यंदा जोंधळा लावला असून या जोंधळाला चांगले उत्पादन मिळत आहे.
पोषक वातावरण रोगराई चा अभाव आणि इतर अनेक कारणांमुळे या जोंधळाचे पीक चांगले आले असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. नंदीहळी,सांबरा, मारिहाळ आणि इतर भागात तसेच या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे जोंधळ्याची रोपे फुलली असून यंदा या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
उत्पादन जास्त झाल्यामुळे दरामध्ये घट येऊ शकते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त उत्पादनामुळे चांगला दर मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होऊ लागली आहे. या पिकाला चांगला दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे सध्या उत्पादन जास्त झाल्यामुळे शेतकरी विक्रीवर भर देत असून तसे न करता चांगला दर येण्याची वाट पाहण्याची गरज निर्माण झाली.