नागरी विमानोड्डाण खात्याने विमान मार्गांची सूची जाहीर केली आहे.जेट एअर वेज च्या पाच प्रस्तावाना तर स्पाइस जेट च्या 24 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.उपलब्ध माहितीनुसार मैसूर, किशनगड(अजमेर), हिंदन(दिल्ली), पुणे, ओझर, हैद्राबाद, कोचीन, अहमदाबाद, जयपूर आणि सुरत या शहरांसाठी बेळगावातून विमानसेवा मिळणार अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. लवकरचं अधिकृत घोषणा होणार आहे.
केंद्रीय विमनोड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी याबद्दल नुकतेच एक ट्विट केले आहे. भारतीय हवाई क्षेत्राचे पंख बळकट करून यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आज उडान 3 चे मार्ग जाहीर करीत आहोत असे त्यांनी लिहिले आहे.
आणखी एक ट्विट मध्ये तर सुरेश प्रभू यांनी उडान समोर आकाशालाही मर्यादा आहेत असे लिहीत या योजनेतून 235 नव्या हवाई मार्गांवर आम्ही देशातील 29 राज्ये जोडत असल्याचे लिहिले आहे.