सात जानेवारीला होणारी उडान ची घोषणा लांबणीवरच पडली होती ती केंव्हा होणार हे अजून स्पष्ट नव्हते. सरकार ला १११ निविदा अर्ज मिळाले असून त्यापैकी किती अर्जान्ना मंजुरी मिळाली आहे हे आज जाहीर करण्यात आले आहे.यापैकी किती सत्यात उतरणार हे महत्वाचे ठरणार आहे.
बेळगावला एकूण मिळालेले मार्ग 13 आहेत. यामध्ये
2 राजस्थान,2 गुजरात,1 मध्यप्रदेश,1 दिल्ली असे मार्ग मंजूर झाले असून त्यापैकी किती मार्गावर विमाने सुरू होतील हे पुढील काळात ठरणार आहे.
केंद्रीय महसूल खात्याकडून सबसिडीची तरतूद झाली नसल्याने उशीर होत होता. पण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली आहे.
या योजनेत विमानातील ५० टक्के जागा सवलतीच्या दरात मिळतात. या जागा रिकाम्या राहिल्या तर सरकार विमान कंपनीला काही रक्कम देते. ही रक्कम केंद्र सरकार ८० टक्के आणि राज्य सरकार २० टक्के भार उचलून देते.त्यामुळे ही योजना आपण मंजूर करून आणली असे श्रेय लाटून घेण्याचा प्रयत्न झाला.
सध्या १७ मार्गांसाठी अर्ज आले होते त्यात
बेळगाव ते सुरत
बेळगाव ते आग्रा
बेळगाव ते तन्जोर
बेळगाव ते जयपूर
बेळगाव ते जोधपूर
बेळगाव ते तिरुपती
बेळगाव ते अहमदाबाद
बेळगाव ते पुणे
बेळगाव ते ओझर ( नाशिक)
बेळगाव ते नागपूर
बेळगाव ते हैद्राबाद
बेळगाव ते काडाप्पा
बेळगाव ते मैसूर
बेळगाव ते इंदूर
बेळगाव ते गुलबर्गा
हे मार्ग समाविष्ट आहेत.