उडान मध्ये किती कंपन्यांनी आपली नोंदणी केली याची माहिती सात किंवा आठ जानेवारीला बाहेर येऊ शकते. उडान अंतर्गत बेळगाव विमानतळाचे काम सुरू झाल्यानंतर सर्व प्रक्रिया जर पूर्ण झाली तर सोमवारी किती कंपन्यांचे किती नवे रूट सुरू होतील याची माहिती मिळू शकणार आहे. अन्यथा मंगळवार पर्यंत केंद्रीय विमान उड्डाण प्राधिकरण ही माहिती जाहीर करू शकते. कोणत्या विमान कंपनीला कुठले रोड मंजूर झालेले आहेत याची माहितीही मंगळवार पर्यंत बाहेर येऊ शकणार आहे.
निविदा प्रक्रिया सात जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह ने बेळगाव विमानतळाचे प्रमुख संचालक राजेश कुमार मौर्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली आहे.
यादी जाहीर झाल्यानंतर विमान कंपन्यांनी भरावयाचे शुल्क व इतर प्रक्रिया पार पाडल्या जातील असे त्यांनी सांगितले. विमान कंपन्यांना ही आपल्याला कुठला रूट मिळाला आहे आणि मिळालाय की नाही याची माहिती सोमवार नंतरच मिळणार आहे शुल्क भरणा प्रक्रिया झाल्यानंतर विमान कंपन्या आपल्या विमानांच्या उपलब्धतेनुसार विमानसेवा सुरू करू शकणार आहे. विमान कंपन्या आपल्या सोयीनुसार कुठले टाईमटेबल योग्य आहे याची माहिती केंद्रीय विमान उड्डाण प्राधिकरणाला देणार आहेत. त्यानंतरच विमानसेवा सुरू होऊ शकणार आहे असे मौर्य यांचे म्हणणे आहे.
(Night view of belgaum sambra air port)
बेळगाव विमानतळावरून उडान अंतर्गत वाढीव विमानसेवा नेमकी केव्हा सुरू होईल हे आताच सांगता येणार नाही विमान कंपन्यांकडे उपलब्ध विमान संख्येनुसार आणि त्यांच्या या वेळापत्रकानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणत्या तारखेपासून कोणती विमानसेवा सुरू होणार आणि त्याची वेळ काय असेल याची माहिती देता येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जानेवारी महिना पूर्ण जाणार आहे, फेब्रुवारी महिन्यातील काही काळ यासाठी जाईल त्यामुळे मार्च महिन्यापासून विमानसेवा खऱ्या अर्थाने सुरू होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
बेळगाव तिरुपती आणि बेळगाव किशनगड,बेळगाव हैद्राबाद,जयपूर,दिल्ली पुणे सुरत आदी सतरा ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी ट्विट द्वारे दिली होती यासंदर्भात बोलताना या दोन्ही सेवाना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास राजेश कुमार मौर्य यांनी व्यक्त केला फेब्रुवारी नंतरच बेळगाव विमानतळावरून विमानांचे उड्डाण खऱ्या अर्थाने होऊ शकेल अशी माहिती सध्या तरी मिळाली आहे.बेळगाव विमान तळा शेजारी एअर फोर्स बेस आहे त्यामुळे विमान कंपन्याना संरक्षण खात्याची देखील परवानगीची गरज लागणार आहे.