31डिसेंम्बर रोजी अलारवाड क्रॉस जवळ शेतात खून झालेल्या हलगा येथील युवकाच्या मारेकऱ्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून माळमारुती पोलिसांनी या खून प्रकरणी दोन युवकांना अटक केली आहे.
हलगा येथील उमेश अप्पय्या कुंडेकर वय 44 याचा खून करणारे दोघे खुनी माळमारुती पोलिसांना सापडले आहेत. त्यांना अटक करून हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे .गुरुप्रसाद महादेव शेट्टी वय 21 वर्षे रा.हलगेकर बिल्डिंग अनगोळ रोड वडगाव,प्रवीण गुरुपुत्र जिंदी वय 21 रा. 23 रा.लक्ष्मी नगर वडगांव अशी त्या दोन खुनींची नावं आहेत. या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी माळमारुती पोलीस स्थानकाचे सिपीआय बी आर गड्डेकर यांनी चांगली तपास यंत्रणा राबवली आहे.
उमेश कुंडेकर याचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. जुन्या पी बी रोड वर एका दारू दुकाना जवळ मारेकरी उमेशला भेटले तुला हलग्या कडे सोडतो म्हणून सोबत गेले होते लूटमार करण्याच्या उद्देशाने ग्लासच्या बाटलीने डोक्यात वार करून खून केला.त्याच्या जवळील 870 रुपये, मोबाईल आणि दुचाकी घेऊन पलायन केले होते.
उमेश कडून पैसे उकळतेवेळी झालेल्या वादावादीत उमेशने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यावरून मारामारी होऊन या दोघांनी त्याच्या काचेच्या बाटलीने घालून खून केला आहे .तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या वापरातून त्या दोघांना शोधण्यात आले असून मोबाइल ट्रॅक रेकॉर्ड चाही वापर करण्यात आलाय.
या दोघांनी उमेश चा मोबाईल आणि मोटर सायकल गायब केली होती ती मोटरसायकल तिसऱ्या व्यक्तीला विकण्यात आली होती. मोबाईलचा वापर स्वतः सुरू केल्यानंतर पोलिसांना त्यांना पकडणे सोपे झाले .या प्रकरणात मयत उमेशच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. मार्केट पोलीस उपायुक्त एन व्ही भरमनी यांच्या नेतृत्वात निरीक्षक बी आर गड्डेकर आदी सहकाऱ्यांनी तपास केला.केवळ दहा दिवसांत या खून प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी माळ मारुती पोलिसांचे अभिनंदन केले आहे