भारत बंदच्या पाश्वभूमीवर बेळगावातील सर्व शाळा कॉलेज बंद सुट्टी देण्यात आली आहे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उद्या मंगळवारी 8 जानेवारी रोजी शाळा बंद राहतील असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या बंद ला सोमवारी दुपारीच बेळगाव शहरातील ऑटो रिक्षा चालकांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे शाळकरी मुलांसाठी शाळांना देखील सुट्टी जाहोर झाली आहे.मंगळवारी भारत बंद रोजी शाळा कॉलेज सुरू आहेत की नाही यासाठी अनेक पालकांनी बेळगाव live कडे संपर्क केला होता मात्र डी सी यांनी सुट्टी जाहीर केली नव्हती त्यामुळे याबाबत घोषणा झाली नव्हती अखेर बोमनहळळी यांनी पत्रक काढून सुट्टीचा आदेश दिला आहे. या अगोदर व्ही टी यु आणि आर सी यु च्या सर्व परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत.
ऑल इंडिया एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया यांनी देशातील सर्व बँकांना दोन दिवसीय बंद आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दोन दिवसांच्या या बंदला अनेक INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, AICCTU, UTUC, TUCC, LPF SEWA या दहा युनियन पाठिंबादेत राष्ट्रीय स्तरावर आंदोलन समर्थन केले आहे.
ऑटो रिक्षा देखील बंद असणार आहेत सोमवारी ते मंगळवारी सहा पर्यंत शहरातील ऑटो बंद असतील.ट्रेड युनियन नी पुकारलेल्या बंदच्या मागण्यात इन्शुरन्स,आर टी ओ चार्जेस आदी ऑटो चालकांच्या मागण्या देखील सामील आहेत त्यामुळं रिक्षा देखील बंद असणार आहेत.
या दोन दिवसीय बंद मुळे रेल्वे बँक,इलेक्ट्रिक सिटी विभाग कर्मचारी,यासह अनेक तळागळातील प्रभावित असणार आहे.ऑटो रिक्षा ,ट्रक आदी पुढील 48 तास बंद असणार आहेत.कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाने या बंदला पाठिंबा दिल्यामुळे दोन दिवस बस देखील बंद असणार आहेत.