फसवणूक केल्याप्रकरणी समिती नेते, माजी तालुका पंचायत सदस्य व एपीएमसीचे माजी अध्यक्ष बाबुराव पिंगट( वय ६१ ) रा. काकती यांच्यासह तिघांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करून त्यांना हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे. बाबुराव पिंगट यांच्यासह नागप्पा बाजेकर (वय ६४) आणि मनोहर परमोजी ( वय ४८) सर्वजण राहणार काकती या दोघांनाही अटक करण्यात आले आहे.काकती पोलिसांनी गुन्हा क्रमांक ११/१९ नुसार भादवी कलम २०५,४१८, ४१९, ४२० अन्वये ही कारवाई केली आहे.
तक्रारदार अश्विन चरंतीमठ( रा. सदाशिवनगर) यांची काकती येथे जमीन आहे. या जमिनीवर बेकायदेशीररित्या कागदपत्रे फेरफार करून आपली नावे चढवून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.