31 रोजी उमेदवारीबाबत बेळगावात बैठक’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी बेळगावला येत आहेत.एकीकडे भाजपचा यंदाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे त्या सोबत काँग्रेसने देखील प्रभारीची बैठक बेळगावात ठेवली आहे.
काँग्रेस प्रभारी ए आय सी सी सचिव माणिकम टागोर,डॉ साके सैलजनाथ,पी सी विष्णूनाथ हे काँग्रेस तालुका जिल्हा स्तरीय सर्वपदाधिकारी,आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांचे मत आजमावून घेणार आहेत . उमेदवारी कुणाला द्यावी याबाबत मत आजमावून घेणार आहेत.
गुरुवारी 31 जानेवारी रोजी दिवसभर बेळगाव येथील हॉटेल संकम मध्ये बैठका आयोजित केल्या असून सकाळी 11 वाजता बेळगाव लोकसभा मतदार संघ ,दुपारी 2 वाजता चिकोडी तर सायंकाळी 4 वाजता विजापूर लोकसभा मतदार संघाची बैठक बोलवण्यात आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातून यावेळी अनेकजण इच्छुक असून त्यांनी लॉबिंग देखील करायला सुरुवात केली आहे.आमदार विवेकराव पाटील,अंजलीताई निंबाळकर,एस एस साधूंनावर,शिवकांत सिदनाळ,लक्ष्मी हेब्बाळकर,प्रकाश हुक्केरी यांच्या सह इतरां बाबत बैठकीत चाचपणी केली जाणार आहे.काँग्रेस प्रभारी यांची बेळगावातली बैठक महत्वाची असून या बैठकीतील अहवाला नंतर काँग्रेसचा उमेदवार कोण यावरून ठरवले जाणार आहे त्यामुळं या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.