Wednesday, December 25, 2024

/

क्रिकेट बेटिंग प्रकरणी तिघांना अटक

 belgaum

भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील क्रिकेटच्या सामन्यादरम्यान बेटिंग करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.सीसीआयबी पोलीस पथकातर्फे क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

बेळगाव परिसरात बेटिंगचे प्रस्थ वाढत चालले आहे. याबद्दलची माहिती मिळताच सीसीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे.जुन्या पी बी रोड वर सामना सुरू असताना बेटिंग घेणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडून पोलिसांनी कारवाई केली आहे.

रात्री उशिरा पर्यंत या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .मात्र कुणा कुणाला अटक झाली आहे नेमके सट्टेबाज कोण आहेत यांची नावे मात्र कळू शकली नाहीत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.