तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या कामास रविवारी सुरुवात झाली आहे.खासदार सुरेश अंगडी यांनी भूमी पूजन करून या कामाचे उदघाटन केलं. यावेळी वन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधुश्री पुजारी, आमदार अनिल बेनके अभय पाटील,रेल्वेचे जी एम अजय सिंह आदी उपस्थित होते.या ब्रिजला लेव्हल क्रॉसिंग (L C) no 381 असे म्हटले जाते. तिसऱ्या गेटचे ब्रिज मार्च 2020 ला पूर्ण होणार आहे.
या ब्रिजची माहिती खालील प्रमाणे
तिसरे रेल्वे गेट साठी 27 कोटी 28 लाख खर्च करण्यात येणार आहे यासाठी कर्नाटक राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय अर्धा अर्धा खर्च उचलणार आहे.
गोगटे सर्कल उड्डाण पुल बनवलेल्या कृषी इन्फोटेक कंपनीला हे काम मिळालं आहे.रेल्वे उड्डाण पुलाचा एकूण खर्च:27.28 कोटी आहे.मार्च 2020 पर्यंत काम पूर्ण करण्याचा अवधी देण्यात आला आहे.
Span of RoB: 1 x 2 x 54 Bowstring Girder
Approaches: Panaji Side: (5+6) x 18 m PSC (250 m)
Belagavi Side: (7+6) x 18 m PSC (331 m)
Targeted Completion: March 2020
4 Lane Approach
The 1 x 2 x 54 Bowstring Girder with 4 lane approach roads will give respite to the road users and help in building up the infrastructure for Belagaum city.