Friday, December 27, 2024

/

ठाकरे’चे बेळगावात दणक्यात स्वागत

 belgaum

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाचे बेळगावात मराठी भाषिकांनी जल्लोशी  स्वागत केले.ग्लोब आणी प्रकाश थिएटर समोर मराठी भाषकांनी फटक्यांची आतषबाजी जरत मिठाई वाटप करत बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत झालं.

Thakre movie

काल पासूनच शिवसेने ग्लोब समोर सजावट केली होती शुक्रवारी सकाळी पहिल्या शो च्या अगोदर ढोल ताशा वाजवत स्वागत झालं तर प्रकाश थिएटर समोर समाजसेवक रवी साळुंके शिवसेनेचे बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी चित्रपटाचे स्वागत केले.उपमहापौर मधूश्री पुजारी ,नगरसेवक मनोहर हलगेकर,राजू बिर्जे,विजय भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

ग्लोब थिएटर समोर शिवसेनेचे अरविंद नागनुरी,प्रकाश शिरोळकर,सचिन गोरले,दिलीप बैलूरकर, गजानन पाटील महिला आदीनी स्वागत केलं.एकूणच बेळगावात या चित्रपटाचे बेळगावात दणक्यात स्वागत झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.