हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारलेल्या, त्यांच्या लढाऊ बाण्यावर बनलेला आणि संयुक्त महाराष्ट्र व सीमाभागाच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान अधोरेखित करणारा ‘ठाकरे’ चित्रपट बेळगावकरांनी आवर्जून पाहावा. फक्त बेळगावचे लोक नव्हे तर समस्त सीमाभागाने सीमावासीयांनी हा चित्रपट पाहावाच असे आवाहन केले आहे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी.
आज सकाळी बेळगाव live शी बोलतांना या चित्रपटात सीमावासीयांसाठी मोठी जागा आहे. तेंव्हा त्यांनी तो पाहावा आणि ठाकरे साहेबांनी व शिवसेनेने दिलेले सीमाप्रश्नासाठीचे योगदान पाहून पुन्हा एकदा आपले स्फुरण चेतवल्याशिवाय राहणार नाही. असेही राऊत साहेब म्हणाले आहेत.
बेळगाव शहरात ठाकरे चे काल जोरात स्वागत झाले आणि लोकांनी हा चित्रपट रांका लावून पाहिला. बेळगाव live च्या मदतीने हा जल्लोष आणि उत्साह आपण पाहिला आणि बरे वाटले. त्यामुळे हा चित्रपट नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जोरात चालणार हा विश्वासही त्यांनी बेळगाव live कडे व्यक्त केला आहे.
संजय राऊतजी या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांनी चतुरस्त्र अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांना बाळासाहेब साकारायला लावले आहेत. बाळासाहेब आणि त्यांचे विचार अंगात भिनलेला त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता अशीच संजय राऊत यांनी ओळख आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून आजही येणारे अग्रलेख याची प्रचिती देतात. यातूनच या चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण झाली असल्याने त्यांनी अधिकाराने आणि सीमावासीयांवरील हक्काने सांगितले आहे की हा चित्रपट जरूर बघाच.
सीमावासीय आणि शिवसेनेचे नातेही दृढ आहे. सीमावासीयांच्या प्रत्येक लढ्यात बाळासाहेब आणि शिवसेनेने आपला हात पाठीशी ठेवला तर शिवसैनिक खांद्याला खांदा लावून आंदोलनात पुढे राहिले.
आजही सीमाभागात खुट्ट झाले की महाराष्ट्रात पहिला पडसाद शिवसेनाच उमटवते. ही शिकवण देऊन अजरामर झालेल्या बाळासाहेबांचे ऋण फेडणे कठीण आहे. पण त्यांची आठवण जागवण्यासाठी प्रत्येकाला बघावाच लागेल ‘ठाकरे’…….