मागील काही महिन्यांपासून बेकीनकेरे ग्राम पंचायत मध्ये पीडिओ आणि सेक्रेटरी यांच्यामुळे अनेक उद्योग खात्री योजनेतील कर्मचारी बेरोजगार होत असून येथील पीडिओ आणि सेक्रेटरी यांची बदली करावी, अशी मागणी करण्यात येत होती ही बाब गांभीर्याने घेऊन सेक्रेटरीची बदली करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्योग खात्री योजना राबवण्यास बेकीनकेरे ग्राम पंचायतचे पीडिओ आणि सेक्रेटरी हे कुचकामी झाले आहेत. यासाठी खास ग्रामसभा घेण्यात आली होती यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळेच आता त्यांची बदली करण्यास तालुका पंचायतीचे वरिष्ठ अधिकारी सारवासारव करत आहेत.
वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे तालुका पंचायतीचे वरिष्ठ अधिकारी यांनी हा बदलीचा आदेश काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सेक्रेटरी आर एम फगरे यांची बदली करण्यात येणार असून त्यांच्या जागी येळूर येथील सेक्रेटरी यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी पीडिओ बी आर चौगुला यांची बदलीची मागणीही केली आहे.
दरम्यान काही ग्राम पंचायतमधील कुरघोडी मुळे काही
प्रामाणिक अधीकारी वर्गालाही वेठीस धरण्याचा प्रकारही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गावच्या विकासावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.