स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने दोन हजार विद्यार्थ्यांना लाडूचे वितरण करण्यात आले.
पिरनवाडी येथील मराठी व कन्नड माध्यमाच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांना या लाडूचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी तालुका शिवसेनेच्यावतीने ग्लोबल ग्लोबल इंडियाच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. तालुका शिवसेनाप्रमुख सचिन गोरले यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन केले.
बाळासाहेब ठाकरे हे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहे याला साहेबांनी केलेली समाजसेवा कारणीभूत आहे होत आहे असे मत सचिन गोरले यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मुचंडीकर यल्लाप्पा पाटील, बन्सी गुरव,मनोहर पाटील, किरण येळ्ळूरकर सचिन राऊत दिनेश खांडेकर नारायण पाटील आदी पिरनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते