बेळगावच्या प्रदीप सासणेंनी केला विश्वविक्रम…
सुर्यकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम करून बेळगावच्या प्रदीप सासणे यांनी संपूर्ण जगात आपली जन्मभूमी निपाणी आणि कर्मभूमी बेळगाव शहराचे नाव उज्वल केले आहे. आज हा विश्वविक्रम लेले मैदानावर झाला.
ज्या तेजस्वी सुर्यकडे दोन क्षण पाहणे कठीण अशा सुर्यकडे सलग दहा मिनिटे सासणे हे पाहात राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सासणे यांच्या विक्रमाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे अध्यक्ष अॅड. संतोष शुक्ला व सांस्कृतिक मंत्रालयाचे सदस्य भारत शर्मा खास उपस्थित झाले होते. यावेळी शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्र येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् ही संस्था जागतिक मान्यताप्राप्त असून वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करण्यासाठी पडताळणी केली जाते. रविवार सकाळपासूनच प्रदीप सासणे यांच्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
त्यामुळे लेले मैदान गर्दीने फुलून गेले होते. महापौर बसाप्पा चिक्कलदिनी, उपमहापौर मधूश्री पुजारी, आदींच्या हस्ते सासणे यांना विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.