जि पं सदस्य गोरल यांनी दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर गावात कामांचा धडाका लावला असून या गावासाठी केली 90 लाखाची कामे मंजूर केली आहेत.आता याच गावासाठी पाणीपुरवठ्यासाठी 3 कोटींची तयारी सुरू केली आहे.
एक जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या व्यक्तीने आपले येळ्ळूर मतदारसंघातील येळ्ळूर या एका गावामध्ये तब्बल 90 लाखांची कामे मंजूर केली आहेत. आपले मराठी लोकप्रतिनिधी असलेले रमेश गोरल यांनी ही कामे मंजूर करून घेतली असून याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
एमएचपीएस च्या शाळेचा कंपाउंड वॉल साठी त्यानी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे . गावातील पाटील समाजाच्या स्मशानसाठी शेड घालण्यासाठी तब्बल आठ लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे .
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आशा कार्यकर्त्यांसाठी च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मिटींग हॉल साठी नऊ लाख रुपये, जनावरांच्या गावात दवाखान्यासाठी तीन लाख रुपये, येळ्ळूर मधील फुटूक तलावाचा गाळ काढण्यासाठी तीन लाख रुपये, जिजामाता गल्लीत असलेल्या गणेश मंदिराच्या अर्धवट बांधकामाला पूर्ण करण्यासाठी तीन लाख रुपये, पाणंद रोडच्या खडी करण्यासाठी तीन लाख रुपये, कलमेश्वर मंदिराचे सभागृह बनवण्यासाठी दहा लाख रुपये आणि युवक सुदृढ व्हावे त्यादृष्टीने व्यायामशाळा बनण्यासाठी दहा लाख रुपये असा एकूण 89 लाख रुपये निधी त्यांनी येळूर गावासाठी मंजूर करून घेतलेले आहेत.यापैकी तीन कामे पूर्णत्वाला आली असून बाकीचे कामे सुरू झालेली आहेत व लवकरच पूर्ण होणार आहेत.
9 फेब्रुवारीला स्मशानभूमी शेड चे उद्घाटन गावातील लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याचबरोबरीने आता तीन कोटी रुपये निधी मंजूर मंजुरी च्या कामाकडे रमेश गोरल असून हा निधी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण गावामध्ये अंतर्गत पाणी व्यवस्था, घरोघरी पाणी देण्याची व्यवस्था ते करणार आहेत. यासाठी जलकुंभ सुद्धा उभारण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे.