दरवर्षी वसंत ऋतूमध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात मोहरीची फुले पिवळी होताच पंजाब मधील शेतकरी सर्वात आनंदाचा सण ‘बैसाखी’साजरा करत असतात.गहूच्या पिकांची मळणी होताच हा सण साजरा करून शेतकरी विरंगुळा घेत असतात.भात मळणी चा मोसम संपवून बेळगावातील शेतकरी देखील रेणुका यल्लम्मा देवीच्या सणाला बैलगाड्या नेत आनंदाने हा सण साजरा करतात.अश्याच शेतकरी वर्गाची लगबग बैलगाडी सजवण्यासाठी होत आहे.
येत्या जानेवारी २१ तारखेला शाकंभरी पौर्णिमेला सौंदत्ती यल्लम्मा रेणुका देवीची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठी यात्रा भरते.या यात्रा काळात देवदासींचा मोठा भरणा असतो.त्यात नवीन देवीची माळ घेणे, लहान मुलांची नाव ठेवणे,असे अनेक विधी पार पडतात.त्यासाठी बेळगाव तसेच इतर खेडेगावातील जनताही मिळेल त्या वाहनाने जात असते. एकत्रित पणे चार सहा दिवस तिथे रहायच्या तयारीनेच जात असतात.
यावर्षीही अनगोळ, वडगाव,होसूर,बेळगाव भागातील शेतकरीही बैलगाड्या घेऊन जाणार आहेत.आठ ते दहा दिवसाच्या पायी प्रवासासाठी सर्व तयारी करुनच जावी लागते.आता रब्बी पिकं असल्याने थोडी उसंत असते ती देवाच्या भक्तीत घालवून विरंगूळा मिळवण्यासाठीच ही यात्रा साजरी केली जाते.भर पौर्णिमेला तिथे जागा मिळन कठिण असते म्हणूनच आधी जाव लागत.
या यात्रेसाठी रयत गल्ली वडगावमधील शेतकरी आपल्या बैलगाड्या सौंदत्ती डोंगराला घेऊन जातात.आधी एका रयत गल्लीतून पंचवीस बैलगाड्या जात असत पण त्या आता विभक्त पध्दतीने कमी झाल्या तरीही कांही शेतकरी कुटूंब हौसेखातर जातच आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या मित्रांसह बैलगाडी तयार करण्यात लगबग करताहेत.रयत गल्लीतून १६ तारखेला बैल गाड्या निघणार आहेत