बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत बेळगावच्या स्नेहल बिर्जेने मिस महाराष्ट्र किताब पटकावीला आहे.
बेंगलोर येथील गोकुलम ग्रंँड हॉटेल येथे 6 जानेवारी रोजी सिल्वर स्टार ग्रुप (रवी हसन) आयोजित सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मिस महाराष्ट्र किताबासाठी अंतिम फेरीत 27 जणांची निवड झाली. अंतिम फेरीच्या प्रश्नउत्तर,मुलाखत, इंडो-वेस्टर्न, गाऊन रेम्प शो आदी प्रकारात स्नेहलने बाजी मारून महाराष्ट्र किताब पटकाविला आहे.
स्नेहल वडगाव रयत गल्ली राहते.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्नेहल ला तिच्या मित्र-मैत्रिणींचे प्रोत्साहन मिळाले. आई-वडिलांचे पाठबळ तसेच इनक्रेडिबल बेलगाम चे विनायक नायकोजी यांच्या मार्गदर्शनामुळे स्नेहलने आपली यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. यापूर्वी तिने विजय कर्नाटक आयोजित सौंदर्य स्पर्धा,मिस ब्युटी कल्चर कर्नाटक तसेच स्थानिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आहे. जेन कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत असलेली स्नेहल प्रियंका चोप्राला आदर्श मानते.
महाराष्ट्र स्पर्धेतील यशानंतर तिला लाईफस्टाईल ब्रँड कॅटलॉग व एका कन्नड चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल बेळगावात तिचे कौतुक व्यक्त केले जात आहे.