यमकनमर्डी मतदारसंघात येणाऱ्या कडोली या गावात छत्रपती शिवाजी राजांना पूजले जाते. या गावात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा बसवण्याचा कार्यक्रम काल झाला. या भागाचे आमदार असलेले व वन मंत्री झालेले सतीश जारकीहोळी यांनी या कार्यक्रमात पुढाकार घेतला होता. आणि प्रमुख पाहुणे होते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार.
शरद पवारांच्या या कार्यक्रमाला येण्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कर्नाटकात सतीश जारकीहोळी यांचे हात बळकट करण्यात शरद पवारांनी मदत केल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.
कर्नाटकातील काँग्रेस मध्ये अनेक लॉबी आहेत. येथे वर्चस्व वाढविण्याचे प्रयत्न सगळेच राजकारणी करतात .असाच एक प्रयत्न वर्चस्वासाठी शरद पवारांना आमंत्रित करून झाला असल्याची चर्चा सुरू असून कर्नाटक काँग्रेसमध्ये राजकारण करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रातील पवारांनी नक्कीच वाढवण्याची कृती केल्याची चर्चा आहे. कर्नाटक काँग्रेसमधील डी के शीवकुमार यांच्या लॉबीने सतीश आणि त्यांचे बंधू रमेश जारकिहोळी यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न वारंवार केला.
या प्रयत्नात सतीश यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत त्यांना टक्कर दिली आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतीश जारकीहोळी यांचे स्थान अधिक बळकट होण्यासाठी शिवपुतळा लोकार्पण कार्यक्रम आणि त्याला शरद पवार यांची उपस्थिती महत्वाची मानली जात आहे. राजकीय समीकरणे जोडणाऱ्या लोकांनी या घटनेला सतीश जारकीहोळी यांचे राजकीय वर्चस्व वाढविण्यासाठी महत्त्वाची घटना आहे असे बोलले जात असून याचा नक्कीच पुढील लोकसभा निवडणुकीत परिणाम पाहायला मिळणार असे सांगण्यात येते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने भाजपच्या विरोधात बळकट उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत ते उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती बळकट होणे गरजेचे आहे. यासाठी काँग्रेसने बेळगाव जिल्ह्यातील वातावरण बदलण्यासाठी शरद पवार यांचा वापर केला असल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांना सीमावासीय मानतात मराठा समाजात त्यांना मानाचे स्थान आहे याचबरोबर कर्नाटकातील काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते शरद पवारांचा शब्द ऐकतात त्यामुळेच शरद पवारांनी या कार्यक्रमाला येण्यावरून राजकीय चर्चांना वेग आला आहे.