‘आज समाजिक कार्याची मोठी गरज आहे सेवाभावी माणसे जगभर पसरलेली आहेत माझ्या वडिलांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कर्नाटक आरोग्यधामात सुरू केलेलं कार्य गेल्या 84 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे त्याच कार्याची मला येथे अनुभूती आली आणी खऱ्याखुऱ्या समाजसेवेचे दर्शन मला घडले ‘असे विचार कर्नाटक आरोग्यधाम घटप्रभा चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनश्याम वैद्य यांनी बोलताना व्यक्त केले
येथील शांताई वृद्धाश्रमाचा 20 वा वर्धापन दिन शनिवारी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमास पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी शांताईच्या श्रीमती शांताबाई पाटील या होत्या कार्यक्रमाची सुरुवात शांताई मधील आजींच्या स्वागत गीताने झाली .पाहुण्यांचे हस्ते दिप प्रज्वलन झाल्यावर शांताईच्या वृद्धाश्रमाची माहिती जैन इंजिनियरींग कॉलेजचे डॉक्टर रोहितराज यांनी करून दिली पत्रकार प्रसाद प्रभू यांनीही शांताईची माहिती दिली
रजनी देशपांडे या वृद्धाश्रमातील आजीने वृद्धाश्रमाबद्दलचे आपले अनुभव कथन केले
बेळगावच्या डीसीपी सीमा लाटकर , कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ दिव्या शिवराम, हिंडलगा कारागृहाचे मुख्य अधीक्षक टी पी शेष , कोल्हापूरच्या माई सावली केअर सेंटरच्या गौरी देशपांडे , कर्नाटक आरोग्यधाम घटप्रभा चे घनश्याम वैद्य ,बीटी पाटील उद्योग समूहाचे भागीदार बाळासाहेब पाटील , रोटरी क्लबचे प्रांतपाल आनंद कुलकर्णी आणि वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक नागेश चौगुले व नितीन खोत यांचा यावेळी शाल, पुष्पगुच्छ ,स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी बोलताना सीमा लाटकर यांनी वृद्धाश्रमाच्या कार्याचे कौतुक केले ‘घरापेक्षाही मोठे काम या वृद्धाश्रमात सुरू आहे प्रत्येक बेळगावकरांनी एकदातरी आश्रमला भेट द्यावी असे सांगून मै यहंन्से कुछ तो लेके जा रही हू ‘अशा आपल्या भावना व्यक्त केल्या
आपल्याला येथे काही शिकायला मिळाले अशा शब्दात दिव्या शिवराम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
शेख यांनी वृद्धाश्रमाच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आणि आपली सामाजिक जबाबदारी वाढली असे ते म्हणाले
याद्वारे समाजसेवेचे दर्शन घडले असे तें म्हणाले
या वेळी प्रत्येक वक्त्याने विजय मोरे विजय पाटील व नागेश चौगुले यांचा मुक्त कंठाने गौरव केला विजय पाटील व नितीन खोत यांचेही यावेळी भाषण झाले शेवटी श्री नागेश चौगुले यांनी आभार मानले याप्रसंगी शहराच्या विविध भागातील अनेक मान्यवर स्त्री-पुरुष उपस्थित होते