वृद्ध आणि अनाथांच्या जीवनात आनंदी क्षण देण्याचे कार्य नेहमी करत असलेल्या माजी महापौर विजय मोरे हे अनाथ मुलं वृद्धांना देव दर्शन घडवण्यासाठी पुढे आले आहेत.
शांताई वृद्धाश्रमातील वीस वृद्ध आणि चिकुंबीमठ अनाथा लयातील 22 मुले पंढरपूर येथील विठ्ठल आणि अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाले आहेत.स्वामी समर्थ केंद्र बेळगाव आणि माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातुन या धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शांताई वृद्धाश्रमातील वृद्धांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी विजय मोरे नेहमी प्रयत्नशील असतात या अगोदर त्यांनी वृद्धांना गोवा, मालवण बीच, तिरुपती बालाजी,सुवर्ण सौध सारखी एक छोटी एक मोठी सहल काढली जाते यावेळी मात्र त्यांनी चिकुमबी अनाथांलयाच्या मुलांना देखील घेऊन पंढरपूर अक्कलकोट वारी केली आहे.
रेल्वेचे कोच सुनील आपटेकर कारागृह अधिकारी टी टी शेषा आदींनी या धार्मिक सहलीला रेल्वे स्थानकावर शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वामी समर्थ केंद्राचे 25 सदस्य,मोहमद कुनिभावी रोहन गवली आणि संतोष ममदापुर देखील उपस्थित होते.
Good coverage of the city. thanks.