Thursday, December 26, 2024

/

‘लाखों भाविक यल्लम्मा डोंगरावर’

 belgaum

र्नाटक,महाराष्ट्र ,केरळ आणि गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील यल्लमा  रेणुका देवीच्या कंकण मंगळसूत्राचा विधी भंडाऱ्याच्या उधळणीत आणि “आई उधे ग आई उधे “च्या घोषात पार पडला.

कंकण मंगळसूत्र विधीच्यावेळी यल्लमा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सोमवारी शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्त लाखो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं.सकाळपासूनच देवीचा जग घेऊन भाविक डोंगरावर मोठ्या संख्येने दाखल झाले होते.वाजंत्री लावून वाजतगाजत मिरवणुकीने डोक्यावर देवीचा जग घेवून ठिकठिकाणाहून भाविक भंडाऱ्याची उधळण करत यल्लमा देवीचा जयघोष करत डोंगरावर दाखल झाले.

Renuka devi yatra

सकाळी अभिषेक,होम आणि धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी पालखी सोहळा झाल्यावर उशिरा कंकण मंगळसूत्र विसर्जन विधी पार पडला.यात्रेनिमित्त मंदिर परिसरात पूजा साहित्याची दुकाने,चहा,फराळाची दुकाने थाटण्यात आली आहेत.

बेळगाव परिसरातील गावागावातील भाविक सौन्दत्ती यल्लम्मा देवीच्या डोंगरावर दाखल झाले आहेत सोमवारी मुख्य दिवस होता मंगळवारी अनेक गावातील लोकांचा पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे त्या नंतर बुधवार पासून हळूहळू  यात्रेची गर्दी कमी होणार आहे हा आठवडाभर पूर्ण ही यात्रा चालणार आहे.

रेणूकदेवीचे कार्यकारी अधिकारी रवी कोट्रगस्ती यांनी भाविकांची सोय तसेच बैलहोंगल उप पोलीस प्रमुख करुणाकर शेट्टी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.सुमारे अडीच ते तीन लाख भाविक सध्या डोंगरा वर आहेत अशी माहिती रेणूकदेवीचे कार्यकारी अधिकारी रवी कोट्रगस्ती यांनी बेळगाव live कडे  दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.