‘शिवकालात ज्या अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या त्यामध्ये जिजाऊ, येसूबाई आणि ताराबाई या तिन्ही राण्यांची चरित्रे आजच्या स्त्रियांना केवळ मार्गदर्शन पर नव्हेच तर आदर्शवत ठरणारे आहेत’ असे विचार इतिहासाच्या अभ्यासक कोल्हापूरच्या डॉक्टर मंजुश्री पवार यांनी ‘शिवकालीन स्त्री कर्तुत्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
‘लखुजी राजे यांची जिजाऊ ही कन्या शाहू महाराजांशी विवाहबद्ध झाली आणि त्यानंतर निजामशहाने त्यांच्या वडीलांवर आणि बांधवांवर केलेले अनन्वित अत्याचार त्यांनी पाहिले. निजामशहाच्या या कृतीचा जिजाऊवर प्रचंड परिणाम झाला आणि स्वातंत्र्याच्या उर्मीचे संस्कार त्याने शिवबाला बालपणीच दिले. जिजाउची धीरगंभीर करारी वृत्ती , व्यवहारज्ञान, धर्मनिष्ठा, कार्यनिष्ठा ,चरित्र निष्ठा असामान्य होती त्यामुळे जिजाऊकडे ‘मध्ययुगातील एक क्रांतिकारी स्त्री म्हणूनच पाहावे लागेल’
त्यानंतर त्या म्हणाल्या की, महाराणी येसूबाई यांनी अत्यंत मुत्सद्देगिरीने संभाजी महाराजांना साथ दिली त्यांनी स्वराज्यरक्षण हेच कर्तव्य समजून कार्य केले त्यांचा निस्वार्थीपणा ,धीरोदात्तपणा कौतुकास्पद होता ,संभाजीच्या मृत्यूनंतर ते 31 वर्षे कैदेत होत्या पण तरीही त्यांनी औरंगजेबाला दाद दिली नाही त्यानी तर सात वर्षे लढा देऊन औरंगजेबाला झुंजवलं. हंबीरराव मोहिते यांच्या या कन्येने अनेक वर्षे राज्यकारभार सांभाळला.
ताराराणीसारखी लढाऊ स्त्री जगात झाली नाही असा उल्लेख परदेशी इतिहासकारांनी केलेला आहे. ताराराणींच्या उल्लेखाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊ शकत नाही असे त्या म्हणाल्या