Tuesday, December 24, 2024

/

हे तर सर्वात मोठे दुर्दैव!

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेतील हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गेले दोन दिवस आंदोलन सुरू केले आहे. जे हात कचरा उचलतात त्याच हातांनी शहराच्या रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन केले. या आंदोलनाची गरज का पडली? तर त्यांचे वेतन वेळेवर दिले जात नाही. हे वेतन वेळेवर का दिले जात नाही? तर महानगरपालिका सांगते निधी कमी आहे. शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नसेल तर सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

बेळगाव शहराचा विस्तार मोठा आहे. या शहरात स्वच्छतेला महत्त्व देणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेची कामे केली जातात. जितका निधी स्वच्छतेसाठी खर्च केला पाहिजे आणि कामगारांच्या पगारावर केला पाहिजे तितका निधी महानगरपालिकेच्या खात्यावर खर्च पडतो .मात्र तो काही अधिकारी आणि नगरसेवक यांच्या खिशात जाऊन पडतो. यामुळेच आज हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची अवस्था अशी झाली आहे .

Safai karmchari
त्यांच्यामागे फक्त एकच नगरसेवक आहे. बाकीच्या नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे .हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत द्या अशी मागणी महापौरांसह सर्व नगरसेवक बैठक घेऊन करू शकतात. पण तसे झाले नाही. त्यामुळे सलग दोन दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला अजून यश आलेले नाही. महानगरपालिकेचे दुर्दैव आहे हे की, हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेले असताना पोलीस बंदोबस्तात स्वच्छता करून घेण्याची वेळ महानगरपालिकेवर आली आहे. पण थकित वेतन देण्याच्या बाबतीत ठोस निर्णय घेतला जात नाही .फक्त आश्वासने दिली जातात .यामुळे हे आंदोलन सुरूच आहे .

एकीकडे बेळगावची महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या योजनेत स्मार्ट होण्याची दिशा बघत असताना आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी राखीव असताना याच महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागते. आपले वेतन वेळेवर द्या अशी मागणी करावी लागते. यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे नाही.

Waste

बेळगाव महानगरपालिकेने आता आपल्यावर आलेली ही नामुष्कीची वेळ दूर करून हंगामी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छतेच्या फंडात पैसे खाणारे अधिकारी आणि नगरसेवकांनी आपले काम काय हे जाणून घ्यायला पाहिजे. नाहीतर अशी आंदोलने वाढत जाणार आहेत. यामुळे शहराच्या स्वच्छतेवर तर परिणाम होईलच ,शहराची प्रतिमावरही परिणाम होणार आहे. याचा विचार कोण करणार?

गुरुवारी सफाई कर्मचाऱ्यांनी पुन्हा महा पालिके समोर केलेली निदर्शन पहा खालील व्हीडिओत

सलग दुसऱ्या दिवशी सफाई कामगारांची पालिकेसमोर निदर्शन
Check out @belgaumlive’s Tweet: https://twitter.com/belgaumlive/status/1083242328855322624?s=08

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.