रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सव आज पासून सुरू होणार आहे. येथील सीपीएड मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक समाजात खाण्याची वेगवेगळी आवड जपली जाते मराठी जैन, मुस्लिम ,गुजराती, मारवाडी ,बोहरी अशा अनेक समाजाचे लोक बेळगावात राहतात.
प्रत्येकाच्या चालीरीती आणि खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. सर्व समाजाच्या लोकांना एकाच ठिकाणी आणून त्यांच्या आवडीनुसार खाण्याचे पदार्थ देणे हा उद्देश ठेवून १९९७ मध्ये रोटरी क्लबने हा कार्यक्रम सुरू केला आहे .अविनाश पोतदार यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि तो सर्वानाच आवडता बनला आहे.
आज पर्यंत प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, प्रसिद्ध हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी येऊन शोभा वाढविली आहे .
मागील काही वर्षापासून अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या स्टॉल धारकांचा प्रतिसाद चांगला मिळाला असून रोटरीने नवनवे बदल करून अन्नोत्सवाची शान वाढवली.
यावर्षी २०० पेक्षा अधिक स्टॉल सहभागी होतील त्यामध्ये काश्मिरी पदार्थांपासून कोल्हापुरी मटण, चिकन , मासे आणि शाकाहारी जेवणाचे स्टॉल हे असणार आहेत. मधुर साखर हे सहप्रायोजक आहेत. रोटेरियन संदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व बसवराज विभूती यांच्या उपाध्यक्ष ते खाली रोज ३० कार्यकर्ते काम करत आहेत.
रोत्रीने या उपक्रमांतर्गत मिळणारे पैसे सामाजिक कामासाठी खर्च केले आहेत.
आज पासून सुरू होणारा अन्नोत्सव सिपीएड कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी पाच ते दहा या वेळात १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगावने केले आहे.